आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोलते पाटील डेव्हलपर्सला ४४ लाखांना फसवणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 23, 2021
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : गुन्हे शाखेच्या युनिट-२ची दमदार कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील नामांकीत कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे.

अमोल गेंदलाल साखळे, कुलदीप भिलारे, चेतन पाटील, महेश बालकिशन राठी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राठी आणि पाटील या दोघांना अटक केली आहे. दरम्यान यानंतर कंपनीतील कॅन्सल केलेला चेक त्या खात्यावर डिपॉझिट केला. त्यातून पैसे काढून घेऊन एकूण 44 लाख 1 हजार 637 रुपयांची फसवणूक केली. कंपनीकडून यासंदर्भात गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हर्षल नावगेकर हे कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमध्ये यापूर्वी राठी, साखळे, भिलारे आणि पाटील हे काम करीत होते. कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या काही वेंडर कंपन्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आरोपींनी दुरुपयोग केला. या आरोपींनी 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीत कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बोगस व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्याकरता वापरले. तसेच, कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या स्टील पॉईंटच्या नावाने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार करून बँकेत अकाऊंट काढले.

याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रकाश मोरे करीत आहेत.