आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीत JITO सोलापूर चॅप्टर च्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 1, 2026
Spread the love

बार्शी : जैन समाजातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक तसेच युवकांना आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या व्यापक व्यासपीठाशी जोडण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या JITO सोलापूर चॅप्टरच्या अनुषंगाने बार्शी येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.

जैन समाजातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक तसेच युवकांना आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या व्यापक व्यासपीठाशी जोडण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या JITO सोलापूर चॅप्टरच्या अनुषंगाने बार्शी येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.

श्री वर्धमान जैन स्थानक, बार्शी येथे झालेल्या बैठकीत सोलापूर Chapter अंतर्गत Barshi Unit 1 कार्यरत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सोलापूर चॅप्टरच्या अंतर्गत बार्शी आणि लातूर येथे Units कार्यरत होणार असून, या माध्यमातून दोन्ही शहरांतील जैन उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि युवकांना JITOच्या व्यापक नेटवर्कशी जोडले जाणार आहे.

या बैठकीस जीतो पुणेचे व्हाईस चेअरमन अजय मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे येथील JITO Board of Director अभिजीत डुंगरवाल यांची विशेष उपस्थिती होती.

सोलापूर Chapterच्या Board of Directors मधील अभय सुराणा, प्रवीण वाणीगोता, चित्रांग डाखलिया, अशिष पंचमीया, अमित कवाड आणि साहिल भंडारी उपस्थित होते.

तसेच श्री वर्धमान जैन स्थानक संघाचे अध्यक्ष जयचंद सुराणा, सचिव ॲड. दिनेश श्रीश्रीमाळ आणि श्री ऋषभदेव श्वेतांबर जैन मंदिराचे ट्रस्टी शैलेश वखारिया उपस्थित होते. सूत्रसंचालन पवन श्रीश्रीमाळ यांनी केले.

अजय मेहता यांनी JITOची संकल्पना, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि सदस्यत्वाच्या संधींची माहिती दिली. Business networking, referrals, knowledge sharing, अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि leadership developmentच्या माध्यमातून JITO सदस्यांना विविध संधी उपलब्ध करून देते.

यावेळी JITO Youthच्या कार्याचीही माहिती देण्यात आली. युवकांमध्ये leadership, networking, entrepreneurship, skill development आणि समाजसेवेची भावना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

बार्शीतील युवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक युवकांना जीतो युथशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याचा शब्द दिला. लातूर येथे झालेल्या बैठकीनंतर 22 Patron Members JITOशी जोडले गेले असून, बार्शीतील बैठकीनंतर 15 ते 16 नवीन Patron Members जोडले गेल्याची माहिती देण्यात आली.

सोलापूर चॅप्टर मध्ये सध्या 4 CP Members आणि 45 Patron Members आहेत. 2 लाखांच्या Patron Membershipद्वारे सदस्यांना व्यापक JITO नेटवर्क, business networking, professional interaction, knowledge sharing तसेच शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते.

व्यवसायाच्या निमित्ताने अन्य शहरात स्थलांतरित झाल्यास सदस्यत्व संबंधित Chapter किंवा Unitमध्ये एकदा Transfer करता येते. तसेच सदस्याला सक्रियपणे कार्य करणे शक्य नसल्यास, नियमानुसार मुलाला किंवा भावाला सदस्यत्व एकदाच Transfer अथवा Change करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

उपस्थितांनी सदस्यत्व, त्याचे फायदे, Chapter व Unitची कार्यपद्धती, business networking, JITO Youth आणि भविष्यातील उपक्रमांबाबत प्रश्न उपस्थित केले. अजय मेहता यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे देत शंकांचे निरसन केले.

सोलापूर Chapter अंतर्गत Barshi Unit 1 आणि Latur Unit कार्यरत होणार असून, स्थानिक उद्योजकांना नवीन व्यावसायिक संपर्क आणि संधी उपलब्ध होणार आहेत.

JITO Youthच्या माध्यमातून युवकांनाही व्यवसाय, नेतृत्व आणि समाजसेवेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे.

बार्शीतील जैन समाजातील बांधव आणि युवकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सक्रिय सहभागाचा निर्धार व्यक्त केला. “Business Growth सोबत Community Growth” या संकल्पनेला बळ देणारी JITO Solapur Chapterची ही वाटचाल बार्शी आणि लातूरच्या जैन समाजासाठी नवी दिशा ठरणार आहे.