• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पेपरफुटीच्या दोन लिंक; 28 जणांना अटक

November 30, 2023
0
27 12 2021 news 4 scaled
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पोलिसांचा धक्कादायक खुलासा : आरोग्य भरतीचा पेपर न्यासा कंपनीतूनही फुटला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात सध्या अनेक पेपरफुटी प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आरोग्य भरती प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोन एजंटना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निशीद रामहरी गायकवाड (वय-43 रा. 501 शेवळकर गार्डन, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर मुळ रा. 52, आशियाड कॉलनी, शेगांव-रहाटगांव रोड, अमरावती) व त्याचा साथिदार राहुल धनराज लिंघोट (वय-35 रा. देवी पार्क, जावरकर लॉनच्या मागे, अमरवाती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी निशीद गायकवाड याने परीक्षेपूर्वीच पेपरफोडून ते एजंटद्वारे परीक्षार्थींकडे दिल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पेपरफुटीच्या दोन लिंक…

आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत. पहिल्यांदा आरोग्य विभागाचा सह संचालक महेश बोटले, मुख्य प्रशासकी अधिकारी, आरोग्य विभाग लातूर प्रशांत बडगिरे, वैद्यकिय अधिकारी आरोग्य विभाग आंबाजोगाई डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांना अटक करण्यात आली होती.

आता हा पेपर जिथून प्रिंट झाला तिथूनच फुटला असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पेपरफुटीच्या दोन लिंक आतापर्यंत तपासात समोर आल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 18 आरोपींना अटक केली असून यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी, एजंट आणि काही परीक्षार्थींचा समावेश आहे. आरोपींनी 100 पैकी 92 प्रश्न परीक्षेपूर्वीच फोडले होते.

तुकाराम सुपेकडून रोख रक्कम, दागिने जप्त…

आरोग्य भरती पेपरफुटीचा तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना म्हाडा परीक्षेचा पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. याच दरम्यान टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास करुन पोलिसांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली. तुकाराम सुपे याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकून पोलिसांनी 3 कोटी 23 लाख 36 हजार 840 रुपये रोख आणि 67 लाख 78 हजार 800 रुपये किंमतीचे 150.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू जप्त केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 6 कोटीच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोग्य, म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकुण 28 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. प्रकरणाचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट 4 जयंत राजूरकर करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, पुंडलीक, अश्वीन कुमकर, चालक सोनूने, शाहरुख शेख, श्रीकांत कबूले यांच्या पथकाने केली.

29 12 2021 news 4
Download

Latest Articles

पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

March 9, 2026
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

March 9, 2026
माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

March 9, 2026
आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

March 9, 2026
Load More
Previous Post

कोयता-कुऱ्हाडीने वार करीत नुकसान करणारे चौघे अटकेत

Next Post

राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

March 9, 2026
माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

March 9, 2026
आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

March 9, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

March 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

March 9, 2026
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

March 9, 2026
माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

March 9, 2026
आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

March 9, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

March 9, 2026
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta