आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 29, 2021
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ताडीवाला रोड येथील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तू छोटू ओव्हाळबरोबर नाही, तर माझ्याबरोबर फिरायचे, असे सांगून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ताडीवाला रोड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

किरण खरात (वय २६, रा. गल्ली नं.२१, प्रायव्हेट रोड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी करण जगताप (वय २२, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मित्राबरोबर ताडीवाला रोड येथील फोटो स्टुडिओसमोर चर्चा करीत होते. त्यावेळी तू छोटू ओव्हाळ याच्यासोबत का फिरतो, तू आजपासून छोटू ओव्हाळ सोबत न फिरता माझ्यासोबत फिरायचे असे सांगून शिवीगाळ केली. तू माझ्यासोबत फिरणार नसशील, तर तुला जीवंत राहण्याचा काही अधिकार नाही, अशी धमकी देऊन तुला जिवंत सोडणार नाही, असे सांगून कोयत्याने डोक्यात वार केला. एक वार चुकविला मात्र, चुकून उजव्या हातावर लागून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनय कोळी करीत आहेत.