आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयत्याने डोक्यात, हातावर वार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 29, 2021

कोथरूड पोलिसांत गुन्हा : कोथरूडमधील सुतारदरामध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मित्रांबरोबर गप्पा मारत असताना कोयत्याने डोक्यात, हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कोथरूड पोलिसांनी जेरबंद केले. क्रांतीसेना कमानीजवळ म्हसोबा मंदिरसमोर सुतारदरा कोथरूड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी सातच्या सुमारास ही घटना घडली.

यशराज हनुमंत शिंदे (वय १९, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) याला अटक केली असून, इतर पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आकाश सपकाळ (वय २५, रा. शिवकल्याण, अचानक मित्रमंडळाजवळ, कोथरूड, पुणे) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महेश मेहरे, शुभम भोसले याच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. यावेळी आरोपीने फिर्यादी शुभम यास शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केले. कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

get_footer();