आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोल्हापुरातील युवकाला पुणेकर तरुणीने दाखवला इंगा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कोल्हापुरातील करवीर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवून अश्लील मेसेज करणाऱ्या कोल्हापूरातील तरुणाला पुण्यातील तरुणीने चांगलाच इंगा दाखवला आहे. आरोपी तरुणाने अश्लिल मसेज पाठवल्यानंतर तरुणीने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कोल्हापूरातील करवीर येथून आरोपीच्या मुसक्या आवळून पुण्यात आणले.

निलेश सुरेश कांबळे (वय-30 रा. केर्ली ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने पीडित तरुणीशी अश्लिल संभाषण केले होते. तसेच तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तरुणीशी संवाद साधताना अश्लिल बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं होतं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाहीतर आरोपीने पीडित तरुणीला फोन करुन अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याची धमकी दिली. आरोपीच्या या कृत्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोघ घेण्यास सुरुवात केली.

पोलीस आरोपीचा शोध घेत होते मात्र तो नेहमी वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता.
अखेर तांत्रिक तपासात आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांच्या एका पथकाने केर्ली येथे जाऊन आरोपीची उचलबांगडी करुन त्याला पुण्यात आणले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();