आवृत्ती पुणे
← Back to Homepage

औंधमध्ये नाना गायकवाडनंतर सावकारीचे मोठे मॅटर उघड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

पुणे पोलिसांनी केली 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्‍या नानासाहेब गायकवाड याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.

रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय ३८, रा. हजारे सदन, दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बालेवाडी येथील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांनी नाना वाळके याच्याकडून ३ कोटी ५० हजार रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी अनिकेत हजारे यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये व रोखीने २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये असे एकूण ५ कोटी १० लाख रुपये परत केले आहेत. असे असतानाही अनिकेत हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे आर सी बुक, चेक घेतले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली. फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याकडे ४ कोटी ७५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाही तर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध १० ते १५ खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर, अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक केली.

या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी खंडणी व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरु आहे.

get_footer();