भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घराच्या खिडक्या, ऑटो रिक्षाची आणि लिफ्टच्या काचेवर हत्याराने मारून सुमारे दीड लाख रुपयांचे आणि रोख साठ हजार रुपये व दोन तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील सुमा.एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ, बिबवेवाडी येथे ही घटना १ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली.
शफीक शेख (वय ४७, रा. कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कात्रजमधील सुमा. एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ फिर्यादीच्या मुलाबरोबर आरोपीने वाद घालून थोबाडीत मारून ऑटो रिक्षाच्या काचेवर दगड व धारदार हत्याराने मारून नुकसान केले. त्यानंतर घराच्या खिडकी, लिफ्टच्या काचांवर हत्याराने मारून नुकसान करीत शेजारच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड करून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. घरातील रोख साठ हजार रुपये व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. कात्रज पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक घोगरे पुढील तपास करीत आहेत.
