आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलाचे अपहरण करणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 4, 2022
Spread the love

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : सांगली आणि कर्नाटक राज्यातून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगली आणि कर्नाटकमधून जेरबंद केले. न्यायालयाने पाच आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर, सध्या रा. रामानंदनगर, नलावडे मळा, पलूस, जि. सांगली, लक्ष्मण किसन चव्हाण (वय २७ रा. लहू, ता. माढा, जि, सोलापूर), केदार बाळासाहेब शिवपुजे (वय २०, रा. कंडल हायस्कूल रोड, ता. पलूस, जि.सांगली), संतोष धोंडप्पा शेडशाळ (वय २७, रा. किर्लोस्करवाडी, पलूस, जि. सांगली) रमेश भीमगोंडा बिरादार (वय ३८, रा. हल्लुर, ता. मडोलगी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

सोलापूरमधील वळसंग पोलीस स्टेशनमध्ये आठ वर्षाच्या मुलाला अपहरण केल्याप्रकरणी सरुबाई माकप्पा आरकिले (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती.

वळसंग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने मुलाचा फोटो तसेच वर्णन अशी माहिती सोलापूर, नगर, पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणी प्रसारित केली. तसेच मुलाच्या कुटुंबीय नातेवाईकांकडे शोध सुरू केला. त्याचबरोबर पोलिसांची सोलापूर, वळसंग, सांगली, कर्नाटक अश्या ठिकाणी पाच पथके रवाना केली.

दरम्यान, तांत्रिक तपासाआधारे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून एकाला ताब्यात घेण्यात आले. वळसंग पोलिसांनी किर्लोस्कर कंपनी (पलूस, जि. सांगली) येथून तिघांना पकडून मुलाला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मास्टरमाईंड आरोपी हुल्लर याला कर्नाटक येथून ताब्यात घेऊन पाच आरोपींना अटक करून मुलाला आई व मावशीच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, अजय हंचाटे, सूरज निंबाळकर, महाळप्पा सुरवसे, वाळुजकर, दासरी, इनामदार, माने, मालचे, भोसले, बंदीछोडे, गायकवाड, व्हनमोरे, पाटील, रेड्डी, खंडू माळी, रतन जाधव, मांढरे, प्रमोद गायकवाड, बनकर, निलेश वरम यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.