आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिला बँक कर्मचार्‍याचेच सायबर चोरट्यांनी बँक खाते केले रिकामे

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 4, 2022
Spread the love

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : चार हजार रुपयांसाठी गमावले ६४ हजार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बँक खात्याची, गोपनीय माहिती कोणाला सांगू नका, असे बँका आणि पोलिसांकडून सातत्याने सांगितले जाते. असे असले तरी ते लोकांच्या गळी उतरेलच असे नाही. बँकेत काम करणारी एक महिला कर्मचारी बँकांकडून ग्राहकांना सांगणार्‍या खबरदारी स्वत: मात्र विसरली आणि सायबर चोरट्यांनी तिचे बँक खाते रिकामे करीत गंडा घातला. हा प्रकार गणेशखिंड रोडवरील अ‍ॅक्सीस बँकेत २५ ऑक्टोबर रोजी घडला.

याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या अ‍ॅक्सीस बँकेत नोकरी करतात. त्यांनी २०२१ मध्ये नोकरी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करुन त्यांची पेड सर्व्हिस घेतली होती. त्याचे त्यांनी ४ हजार रुपये भरले होते. त्यांना २५ ऑक्टोबर रोजी एक फोन आला होता. चोरट्याने त्यांना आपण नोकरी डॉट कॉमवरुन बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पैसे रिटर्न करण्यात येत आहेत, असे सांगून त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवली. फिर्यादी यांना डेबीट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. आपली माहिती कोणाला देऊ नये, हा संदेश त्या ४ हजार रुपये मिळणार, या विचारात विसरुन गेल्या. त्यांनी माहिती भरुन पाठवली. त्याबरोबर त्यांच्या अ‍ॅक्सीस बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी ६४ हजार ६०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.