आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बंद फ्लॅट फोडून साडेचार लाखांवर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 5, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नऱ्हे-धायरी रोड येथील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ४५ हजार रोख असा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. नऱ्हे-धायरी रोड येथे २ जानेवारी दुपारी अडीच ते ३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने तीन लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ४५ हजार रुपये असा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले पुढील तपास करीत आहेत.