आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लोहगावमध्ये पावणे नऊ लाखांच्या दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 5, 2022
Spread the love

विमानतळ पोलिसांत फिर्याद : वाघोली रस्त्यावर दादाची वस्ती येथे घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बंद घर फोडून चोरट्यांनी आठ लाख ७९ हजार ५०० रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील दादाची वस्ती येथे ही घटना २ जानेवारी रात्री ८ ते ३ जानेवारी २०२२ सकाळी १० च्या दरम्यान घडली.

आकाश खांदवे (वय २८, रा. लोहगाव, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या घराला लावलेले कुलूप चोरट्यांनी उचकटून घरफोडी केली. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून आठ लाख ७९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव पुढील तपास करीत आहेत.