आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन वाहनचोरास २४ तासात केली अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022
Spread the love

चार लाखांचा मुद्देमाल जप्त : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पार्क केलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी 24 तासात ताब्यात घेऊन चोरलेला टेम्पो जप्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला.

याप्रकरणी राजा अरुणकुमार मरीण्यन (रा. महंमदवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी राजा मरीण्यन यांनी त्यांचा मालकीचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (एमएच 12 एसएक्स 2035) 18 डिसेंबर रोजी उरुळी देवाची येथे उभा केला होता. टेम्पो घेण्यासाठी गेले असता त्यांना टेम्पो दिसला नसल्याने त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने केली.