आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दाताची काळजी घ्या, वेळीच उपचार करा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022
Spread the love

डॉ. शोएब सय्यद : लष्कर पोलीस स्टेशनमधील पोलिसांचे केले डेंटल चेकअप

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते. दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात. दात कोरु नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते. दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी, अशा मार्गदर्शनवर सूचना डॉ. शोएब सय्यद यांनी दिल्या.

पोलीस रेझिंग डे निमित्त ईस्ट स्ट्रीट (कॅम्प) येथील एफ.डी.ओ.सी मल्टिस्पेशालिटी डेंटल येथे लष्कर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी डेंटल चेकअप शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

रुट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. शोएब सय्यद, ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. शिबली सय्यद, इंम्पांट स्पेशालिस्ट डॉ. सायना सय्यद, रजिउद्दीन काझी, पोलीस मित्र अरमान शेख, पोलीस उपनिरीक्षक कदम, महाडिक, वाहतूक विभागाचे अधिकारी, अंमलदार कर्मचारी आदी उपस्थित होते.

दंतचिकित्सा शिबिरामध्ये ८०-९० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे डेंटल चेकअप करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एफ.डी.ओ.सी. मल्टिस्पेशालिटी डेंटल जैन क्लिनिकच्या वतीने दातांचे आरोग्य राखण्यासाठी आरोग्य कीट उपस्थितांना भेट देण्यात आले.