आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तोतया पोलिसांनी 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 8, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद : कात्रज – कोंढवा रोडवर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दोन तोतया पोलिसांनी एका ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला या भागात चोर्‍या खूप होतात. हातातील अंगठ्या काढून ठेवा, असे सांगून हातचलाखीने ३ अंगठ्या चोरुन नेल्या. ही घटना कात्रज-कोंढवा रोडवर ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

याप्रकरणी शुक्रवार पेठेत राहणार्‍या एका ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे कात्रज कोंढवा रोडवरुन जात असताना क्लासिक हार्डवेअरजवळ दोघे जण त्यांच्याजवळ आले.
आम्ही पोलीस असून या भागात चोरीचे प्रमाण खूप आहे. तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवा, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांच्या दोन्ही हातातील ४८ हजार रुपयांच्या तीन अंगठ्या एका कागदात गुंडाळल्या. आरोपींनी फिर्यादी यांना बोलण्यामध्ये गुंतवून अंगठ्या गुंडाळलेला कागद फिर्यादीकडून घेऊन नकली अंगठ्या गुंडाळलेला कागद फिर्यादींच्या खिशात ठेवून ते मोटारसायकलवरुन पळून गेले.