आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 8, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : भाडे देण्यास पैसे नसल्याचा घेतला गैरफायदा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर येथून रिक्षाने जात असताना भाडे देण्यास पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच दोघा जणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाले आहे.

सागर विभीषण बचुटे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तसेच विकीकुमार फुली पासवान (वय २३, रा. कामठे वस्ती, फुरसुंगी), अशोक वीरबहादुर थाप्पा (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या अन्य दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व तिची मैत्रीण हे ५ जानेवारी रोजी रिक्षाने बुधवार पेठेत जात होते. त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा सागर बचुटे याने तिला रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादीवर बलात्कार केला. तसेच, डिसेंबर महिन्यात फुरसुंगी येथे फिर्यादी रहात असताना विकी पासवान व अशोक थाप्पा यांनी त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, पोलीस निरीक्षक डगळे अधिक तपास करीत आहेत.