आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यात बॅडमिंटनपटू काश्मिरा भंडारीचा दुर्दैवी मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

लक्ष्मीनारायण चौकात घडली घटना : डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे बेतलं जीवावर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करणं पुण्यातील एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना, डाव्या बाजूला आधीपासून एक चारचाकी गाडी पार्क केलेली होती. त्यामुळे दुचाकीवरील तरुणीने अचानक ब्रेक दाबला. त्याचवेळी तरुणी ट्रकच्या चाकाखाली पडली. ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेल्याने तिचा मृत्यू झाला. हा थरारक अपघात पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात बुधवारी सकाळी झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला आहे.

काश्मिरा प्रशांत भंडारी (वय-20) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. काश्मिरा ही पुण्यातील प्रसिद्ध फटाके व्यापारी प्रशांत भंडारी यांची कन्या होती, असे वृत एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे. मयत काश्मिरा ही एक गुणवंत बॅडमिंटनपटू होती. तिने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. अशा एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काश्मिरा सुरज गार्डन येथून काही कामानिमित्त लक्ष्मीनारायण चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होती. त्यावेळी तिच्या पुढे एक कचऱ्याचा ट्रक होता. त्यावेळी काश्मिराने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण डाव्या बाजूला आधीच एक चारचाकी गाडी पार्क केली होती. त्यामुळे तिला डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करता आले नाही. त्यामुळे तिने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरली आणि काश्मिरा थेट ट्रकखाली पडली आणि काही क्षणात ट्रकने काश्मिराला चिरडलं. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.