आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाहतूकच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 10, 2022
Spread the love

राहुल श्रीरामे : येरवडा येथे देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटलच्या वतीने केली नेत्रतपासणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर वाहतूक नियमन करतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर प्रदूषण, उष्णता, वाहनांच्या प्रखर लाईट्सचा प्रेशर येत असून, दृष्टीवर परिणाम होतो. मात्र, त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी नेत्र शिबिर घेतल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

कोथरूडमधील देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर यांच्या सहकार्याने येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये नेत्र शिबिर आयोजित केले होते. यावेळी ११० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डोळ्यांचे प्रेशर, ऑटो रिफ्रॅक्शन, चष्मा नंबर काढणे अशा तपासण्या करण्यात आल्या.