सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव बोअरवेल मशीनच्या ट्रकची मोपेडला धडक बसून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर ११ जानेवारी २०२२ सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.
विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०, रा. औरा एलिगन्स, दावत हॉटेलमागे, वडगाव बु।।, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सचिन कुलकर्णी (वय ३९, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल नवले ब्रिजजवळून कात्रज रोडने मोपेडवरून जात होते. त्यावेळी भरधाव बोअरवेल मशीनच्या ट्रकची पाठीमागून धडक बसून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे पुढील तपास करीत आहेत.
