आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांची कामगिरी : ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कात्रज-उंड्री रस्त्यावर कारवाई करत त्याच्याकडून ५० हजार ३०० रुपयांची पिस्टल, तीन काडतुसे जप्त केली.

मनोज ऊर्फ सारस रमेश काडे (वय २९, रा. सत्यवीर मित्रमंडळाजवळ, शिवदर्शन, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत मास्क न वापरणाऱ्यार कारवाई करीत होते. त्यावेळी बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील रेकॉर्डमधील व्यक्ती कात्रज-उंड्री रस्त्यावर थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयावरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार ३०० रुपयांची देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझीनमध्ये तीन जीवंत काडतुसे आढळून आली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.वानवडी विभाग परिमंडल-५चे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करीत आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथकाचे अंमलदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, दीपक जडे, अमोल हिरवे, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलिसांचे विशेष कौतुक केले.