आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चक्क जनरल स्टोअर्समध्ये गांजाची विक्री

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022
Spread the love

हवेली पोलिसांची कामगिरी : शौर्यचा वैभव वनवे गोत्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जनरल स्टोअर्सच्या नावाखाली गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) मौजे खानापूर येथे करण्यात आली. आरोपीकडून 17 हजार 720 रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

वैभव विठ्ठल वनवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, हवेली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांना खानापूर येथील शौर्य जनरल स्टोअर्समध्ये गांजा असून त्याची ग्राहकांना चोरुन विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासह दुकानावर छापा टाकला. वैभव वनवे याच्या दुकानातून एका कापडी पिशवीत लहान मोठ्या 60 प्लास्टिकच्या पिशवीत भरुन ठेवलेला 798 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केला. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार पुढील तपास करीत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नांदे, ए.ए. शिंदे, पोलीस हवालदार कोळेकर, धनवे, काळे यांनी केली.