आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अंगावर गाडी घालतो का म्हटल्याने कोयत्याने केले वार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 18, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांत फिर्याद : येरवड्यात अण्णा भाऊ साठे सभागृहासमोर केली मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने एका तरुणाला गुंडाने कोयत्याने मारहाण करुन त्याच्या घरी जाऊन आई, पत्नी, भावाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार येरवड्यातील यशवंतनगर येथे घडला.

संतोष मारुती महाडिक (वय ४४, रा. नेताजीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर संतोष तुजारे (रा. यशवंतनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे जात असताना सागर तुजारे याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तेव्हा त्यांनी अंगावर गाडी घालतो का असे म्हणाले असता सागर याने फिर्यादी यांना त्यांच्या गाडीवर बसवून अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर आणले. तेथे शिवीगाळ करुन कोयत्याने त्यांच्या हातावर वार केले. त्यानंतर फिर्यादीच्या घरासमोर जाऊन फिर्यादीचे मोटारसायकलच्या टाकीवर कोयता मारुन नुकसान केले. फिर्यादीची आई, पत्नी यांच्या अंगावर धावून गेला. त्यांचा मोठा भाऊ अनिल महाडिक याच्या डोक्यात उलटा कोयता मारुन जखमी केले. पोलीस नाईक माळी तपास करीत आहेत.