आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोयते व काठ्या हवेत फिरवून धमकावणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 19, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : शिवनेरीनगरमधील डीपी रोडवर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोयते व काठ्या हवेत फिरवून आमच्या नादाला लागाल, तर संपवून टाकू, अशी धमकी देणाऱ्या पाच-सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील डी. पी. रोडवर १६ जानेवारी २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

मल्हारी पवार (वय ५२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार दुचाकीवरील पाच-सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील डी.पी. रोडवर फिर्यादीच्या उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्याचवेळी हवेत कोयते व काठ्या फिरवून आमच्या नादाला लागाल, तर संपवून टाकू अशी धमकी देत परिसरात दहशत पसरविली. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदार असगर सैय्यद पुढील तपास करीत आहेत.