कोंढवा पोलिसांत फिर्याद : स.नं.३-४ लक्ष्मीनगरमध्ये घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे ः शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांवर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील लक्ष्मीनगरमध्ये १८ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी शेजारी-शेजारी राहतात. पार्टिशन करताना आरोपीने पाचजणांसह येऊन मुलगा व भाच्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पार्टिशन तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीचे कुटुंबीय घाबरले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
