आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घड्याळाचे दुकान फोडून पावणेतीन लाखांवर डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 21, 2022
Spread the love

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : धानोरीतील भैरवनगरमधील अज्ञात चोरट्याने दुकान फोडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राजेश्वरी वॉच अँड ऑप्टिशन दुकान फोडून चोरट्याने वेगवेगळ्या कंपन्यांची दोन लाख ७६ हजार किमतीची ११८ घड्याळांवर चोरट्यांनी डल्ला मारला. धानोरीतील भैरवनगरमध्ये १८ जानेवारी रात्री साडेदहा ते १९ जानेवारी २०२२ सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही चोरी झाली.

अविनाश पटेल (वय ३६, रा. लोहगाव, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या धानोरीतील भैरवनगरमध्ये राजेश्वरी वॉच अँड ऑप्टिशियनचे दुकान कुलूपबंद होते. अज्ञात चोरट्याने खिडकीचे गज कापून दुकानातील सोनाटा कंपनीसह वेगवेगळ्या किमतीची ७० घड्याळे, टायटन कंपनीची वेगवेगळ्या किमतीची ३३ घड्याळे व फास्ट ट्रॅक कंपनीचे वेगवेगळ्या किमतीची १५ घड्याळे असा एकूण दोन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुकानाच्या प्रवेशद्वार आणि दुकानातील कॅमेऱ्यांचे नुकसान करून डीव्हीआर चोरून नेला आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम पुढील तपास करीत आहेत.