आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोटारसायकल-टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 21, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : वडगावशेरी पोस्ट ऑफिससमोर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आडव्या आलेल्या दुचाकीला चुकविताना नियंत्रण सुटून टेम्पोला धडकून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वडगावशेरी पोस्ट ऑफिससमोर १८ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

किशन विजय पासवान (वय १९, रा. चिंतामणी हॉस्पिटलजवळ, वडगावशेरी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पयवीन मुलाने (गोते माळ, लोणंद, ता. खंडाळा, जि. पुणे) चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व मृत्यू झालेला किसन पासवान मोटारसायकलवरून वडगावशेरी भाजी मंडई येथे जात होते. त्यावेळी दुचाकी आडवी आल्याने पासवानचे वाहनावरील नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसली. या अपघातात मोटारचालक किशन पासवान गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ पुढील तपास करीत आहेत.