आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोन्याच्या दुकानातून २५ हजार रुपयांच्या अंगठीची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 21, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : खरेदीच्या बहाण्याने डाव साधला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या पुरुषाने हातचलाखीने २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली. हडपसर-मगरआळी येथील ज्वेलर्समध्ये १९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.

विपुल वर्मा (वय ३८, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये एका अनोळखी पुरुषाविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विपुल वर्मा यांचे हडपसर-मगरआळी येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. १९ जानेवारी रोजी अनोळखी पुरुष अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. दुकानातील काउंटरवरून फिर्यादीची नजर चुकवून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून चोरटा पसार झाला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक एस. एच. नाळे पुढील तपास करीत आहेत.