आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 21, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : काही समाजामध्ये आजही विवाहापूर्वी तरुणीची कौमार्य चाचणीला बंदी असतानाही उच्चशिक्षित तरुणीला ही चाचणी करण्यास भाग पाडले. पुण्यातील एका उच्चशिक्षित पतीने कौमार्यभंग केल्याचा ठपका ठेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत जानेवारी ते 26 डिसेंबर 2021 दरम्यान घडला.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 28 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन पतीसह अमेरिकेत राहणाऱ्या सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला उच्चशिक्षित असून, पुण्यातीलच एका नामांकित कंपनीत काम करते. या महिलेचा पती देखील उच्चशिक्षित असून तो सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. सध्या तो अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत काम करतो. फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर ते अमेरिकेतील टेक्सास येथे गेले होते. फिर्यादीच्या पतीने लग्न झाल्यानंतर फिर्यादी सोबत शारिरीक संबंध केल्यानंतर तुला ब्लडिंग का झाले नाही, असे विचारले. लग्नाचे अगोदर तुझे कोणाबरोबर शारिरीक संबंध होते का ? अशी सतत विचारणा करुन भांडण काढून फिर्यादीचा छळ केला.

दरम्यान ते अमेरिकेतून कर्नाटकात आले. सध्या ते फुरसुंगीत राहत आहे. या काळात फिर्यादीच्या चारित्र्याचा संशय घेऊन भांडणे काढून मारहाण करुन शिवीगाळ करुन सतत घटस्फोट दे म्हणून धमकी दिली. तर सासू सासर्‍यांनी फिर्यादीचा मानसिक व शारीरीक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक पूनम लाड तपास करीत आहेत.