आवृत्ती पुणे
← Back to Homepage

निलेश घायवळ टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 22, 2022

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : कात्रज स्मशानभूमीसमोरील पुलाखाली पकडून केली अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोथरूड पोलीस स्टेशन मोक्कामधील पाहिजे असलेल्या निलेश घायवळ टोळीतील आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने मुसक्या आवळल्या. कात्रज स्मशानभूमीसमोरील पुलाखाली ताब्यात घेऊन कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले.

तुषार ऊर्फ रावण सुरेश पोळेकर (वय २३, रा. धबाडी ब्रह्मानंद बिल्डिंग, फ्लॅट नं.३, वडगाव बु।।, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-२चे पोलीस अधिकारी-कर्मचारी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोथरूड पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील मोक्का गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी कात्रज स्मशानभूमीसमोर थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कात्रज स्मशाभूमीसमोरील पुलाखालून त्याला ताब्यात घेऊन अटक केले. पुढील कारवाईसाठी कोथरूड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, पोलीस अंमलदार संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारू, गजानन सोनुने, मितेश चोरमोले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();