आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्याने चोरले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 24, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : मुंढवा-खराडी बायपास चौकात चोरट्याने साधला डाव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरील अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मुंढवा-खराडी बायपास चौकात २२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.

खराडीतील ४४ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार दोन अज्ञात मोटारसायकलवरील चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मुंढवा-खराडी बायपास चौकातून पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दुचाकी आली आणि क्षणातच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ५० हजार रुपये किमतीचे चोरून नेले. फिर्यादीने चोर चोर असा आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. चंदननगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पुढील तपास करीत आहेत.