आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 26, 2022
Spread the love

वानवडी पोलिसांची कामगिरी : एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत वाहनचोराला वानवडी पोलिसांनी मेंढापूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथून अटक केली. त्याच्याकडून चार वाहने जप्त करून एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर चोरीचे चार गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

राजू बाळू पाटोळे (वय १९, रा. मु.पो. मेंढापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील तरवडेवस्ती भागात वाहनचोरीच्या अनुषंगाने पोलीस गस्तीवर होते. त्यावेळी काळेपडळ (आदर्श कॉलनी) येथून मोटारसायकल चोरून मेंढापूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे घेऊन गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचून आरोपीला अटक करून तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार वाहने एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर वानवडी-१, हडपसर-२, लोणीकंद पोलीस स्टेशन-१ असे चोरीचे गुन्हे दाखल आहे.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या सूचनेनुसार वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस हवालदार राजू रासगे, अमजद पठाण, संतोष नाईक, संजय बागल, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अमित चिव्हे, दीपक भोईर, निलकंठ राठोड, सिद्धेश्वर कसबे, महिला पोलीस अंमलदार राणी खांदवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.