आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोडी करून मोबाईल चोरणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांची कारवाई : गुन्ह्यातील दहा मोबाईल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी करून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रुपेश दिलीप अडागळे (वय २३, रा. जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे) आणि अक्षय सुदाम जमदाडे (वय २२, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस पेट्रोलिंग सुरू होती. त्यावेळी येरवड्यातील जयप्रकाशनगरमध्ये दोन संशयित उभे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना पकडून त्यांच्याकडील दोन मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून, चोरीला गेलेले सात मोबाईल इतर तीन असे एकूण दहा मोबाईल सुमारे ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे पुढील तपास करीत आहेत.

पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, सहायक पोलीस निरीक्षक आळेकर, सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, पोलीस शिपाई अजित वाघुले, पोलीस नाईक किरण घुटे, पोलीस नाईक, कैलास डुकरे, पोलीस नाईक अमजद शेख, पोलीस शिपाई राहुल परदेशी, अनिल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.