आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात खुपसला चाकू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 26, 2022
Spread the love

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : आनंदनगर झोपडपट्टीत घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मित्राकडून मोबाईल आणून दे, असे सांगितले असतानाही मोबाईल आणून न दिल्याने एकाने १७ वर्षाच्या मुलाच्या पोटात चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

संजय गोकुळ परदेशी (वय ३८, रा. आनंदनगर झोपडपट्टी, मार्केटयार्ड) याला अटक केली आहे. या घटनेत पियुष दीपक शर्मा (वय १७) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आरोपीची आई यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय परदेशी हा फिर्यादीचा मुलगा आहे. फिर्यादी व त्यांचा नातू पियुष शर्मा हे घरात असताना आरोपी संजय परदेशी याने त्याचा मित्र बिल्ला शेख याच्याकडून त्याचा मोबाईल घेऊन ये, असे सांगितले. हे दोघेही मोबाईल आणायला गेले नाही म्हणून संजय याने रागाच्या भरात त्यांना शिवीगाळ करुन पियुष याच्या पोटामध्ये चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संजय परदेशी याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.