आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पतीच्या व्यवसायातील भागीदाराकडून महिलेवर बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : धायरी येथे जानेवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पतीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या एकाने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पुण्यातील धायरी येथे 27 जानेवारी 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला.

याप्रकरणी धायरी येथील रायकर मळा येथे राहणाऱ्या 33 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत 46 वर्षाच्या पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेच्या पतीचा भाजी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. पतीच्या व्यवसायात आरोपी भागीदार आहे. यामुळे पीडित महिलेची आणि आरोपीची ओळख झाली. आरोपी पीडित महिलेला भाजी खरेदी करण्याच्या बाहाण्याने घेऊन जात होता. याच दरम्यान त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन डोणजे, खडकवासला येथील लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच, याबाबत कोणाला सांगितले तर घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीकडून होत असलेल्या अत्याचाराला वैतागून पीडित महिलेने मंगळवारी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फीर्याद दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव करीत आहेत.