आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलीस मुख्यालय : पोलीस, पालिका आणि जि.प.तील मान्यवरांचा सन्मान

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बँडवर राष्ट्रगीत व मानवंदना देऊन साजरा करण्यात आला.



याप्रसंगी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयु्क्त कृष्ण प्रकाश, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार, शासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनामध्ये परेड कमांडर तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक रामकृष्ण गोटमवाड, यांच्यासह शहर पोलीस दलाचे दोन प्लाटून, शहर बँड पथक असे ५४ अधिकारी व ४८२ अंमलदारांनी संचलनामध्ये सहभाग घेतला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस दलातील पोलीस निरीक्षक प्रकाश भिला चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय उत्तम भोंग यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, मेट्रो रेल कॉर्पोरेशनअंतर्गत उत्तम कामगिरीसाठी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अशोक रामचंद्र मोरे, संयुक्त महाव्यवस्थापक भिवाजी सदाशिव पऱ्हाड, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पुणे जिल्हा परिषद, पुणे येथील अंगणवाडी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषद स्वनिधीमधून (सेसनिधी) २०२१-२२ अंतर्गत एकूण १० फिरते पशु चिकित्सालय वाहनांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.