आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाप रे…. पुण्यात 4 महिला डॉक्टरांचा ‘सामूहिक’ विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 28, 2022
Spread the love

२९ वर्षीय महिलेने दिली फिर्याद : सायबर पोलिसांत आंध्र प्रदेशातील एकावर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातील हेल्पलाईनवरील मोबाईल क्रमांकावर अश्लिल फोटो, मेसेज पाठवून 4 महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 2018 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत एका हॉस्पिटलमध्ये घडला आहे.

तिरुपतीराव गुम्मादी (रा. गंगाधरापुरम कांचिली श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश) याच्यावर आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉस्पिटलमधील 29 वर्षीय महिला डॉक्टरने पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला डॉक्टर या ढोले-पाटील रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. 2018 मध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोपी उपचार करण्यासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फॉलोअप कॉल करण्यासाठी मोबाईल ठेवण्यात आले असून यामध्ये व्हॉट्सअप सुरु आहे. हे मोबाईल फिर्यादी यांच्यासह चार महिला डॉक्टर वापरतात. आरोपीने या मोबाईल क्रमांकावर अश्लिल मेसेज, फोटो पाठवून महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे दिपाली भुजबळ करीत आहेत.