आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत पेरणे पोलीस चौकीचे उद्घाटन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 29, 2022
Spread the love

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : पेरणे जयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ महत्तवाची ठिकाणे

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पेरणे जयस्तंभ व संभाजी महाराज समाधीस्थळ ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या चौकीअंतर्गत ८ गावे येत असून, भविष्यात येथील नागरिकांसाठी पोलीस चौकी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.

लोणीकंद पोलीस स्टेशनअंतर्गत पेरणे पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र गुप्ता, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते. यावेळी १ जानेवारी २०२२ रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास विशेष सहकार्य करणाऱ्यांचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

पेरणे येथे पोलीस चौकीची स्थापना करण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.

परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी प्रास्ताविक केले. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी आभार मानले.