आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलींसमोर घाणेरडं कृत्य करणाऱ्या बापाला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 30, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांची कारवाई : पेट्रोल टाकून मारण्याची धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरात पत्नी नसताना १४ व १७ वर्षांच्या मुलांसमोर अंगावरील संपूर्ण कपडे काढून बाप झोपत होता. मुली झोपल्या असताना त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना पैसे दाखवून आपल्याकडे येण्याचे इशारे देणाऱ्या बापाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी मंगळवार पेठेतील एका ४७ वर्षांच्या नराधम बापाला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व तिची १४ वर्षाची बहिण, आई, वडिलांसह मंगळवार पेठेत राहतात. तिची आई घरात नसताना फिर्यादी व तिच्या लहान बहिणीला लाज वाटेल अशा पद्धतीने तिचा बाप अंगावरील संपूर्ण कपडे काढून घरात झोपतो. १८ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादीची बहिण घरात एकटी झोपली असताना तिच्या वडिलाने तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून तिला पैसे दाखवून आपल्याकडे येण्यासाठी हाताने इशारे केले. तसेच २७ जानेवारी २०२२ रोजी १७ वर्षांची फिर्यादी व तिची बहिण घरात एकट्या झोपल्या असताना तिच्या बापानेच तिच्या तोंडावर व छातीवरुन हात फिरवला. फिर्यादीने हा प्रकार आईला सांगितल्याने त्याने त्यांना शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.