आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बंद घर फोडून ५७ हजार ५०० रुपयांच्या ऐवजाची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 30, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : आव्हाळवाडी-वाघोली येथील बंद घरातील ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे ः बंद घर फोडून चोरट्याने १७ हजार ५०० रुपये रोख आणि दागिने असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. आव्हाळवाडी-वाघोली (ता. हवेली) येथे २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वा आठ ते २३ जानेवारी २०२२ रात्री आठच्या दरम्यान चोरीची घटना घडली.

महेश हरिहर (वय ४५, रा. आव्हाळवाडी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी राहत्या घराला कुलूप लावून नेरुळ-मुंबई येथे गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप उचकटून रोख १७ हजार ५०० रुपये आणि दागिने असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पुढील तपास करीत आहेत.