आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लॉक करून पार्क केलेल्या टेम्पोमधून मोबाईलची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 30, 2022
Spread the love

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : टेम्पोचालक टेम्पोमध्ये झोपल्यानंतर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : टेम्पो पार्क केलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने सात हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. मार्केटयार्डमधील गेट क्र.४मध्ये पार्क केलेल्या टेम्पोमध्ये २४ जानेवारी २०२२ रोजी पहाटे तीन ते सकाळी ७ दरम्यान ही चोरीची घटना घडली.

वैभव साळुंखे (वय ३६, रा. ताहुरवस्ती, ता. जि. सातारा) यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने मार्केटयार्डमध्ये टाटा टेम्पो पार्क करून डॅशबोर्डवर मोबाईल ठेवून दरवाजा लॉक केला आणि पाठीमागे झोपले.

दरम्यान अज्ञात चोरट्याने टेम्पोमधील डॅशबोर्डवरील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.