आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिलेसोबत अश्लील चाळे करणारा असिस्टंट मॅनेजर अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 30, 2022
Spread the love

म्हाळुंगे पोलिसांनी केली कारवाई : अश्लील मेसेज पाठवून पदाचा केला गैरवापर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची संतापजनक घटना चाकण (जि. पुणे) येथे घडली. याप्रकरणी कंपनीतील असिस्टंट मॅनेजरला चाकण पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार 12 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत म्हाळुंगे येथील व्हेरॉक इंजिनिअरिंग लि. या कंपनीमध्ये घडला आहे.

जाक्सन अरुण अल्हाट (वय-34 रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय कामगार महिलेने गुरुवारी (दि.27) म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पीडित महिला व्हेरॉक इंजिनिअरिंग लि. या कंपनीत काम करतात.

काम करत असताना आरोपी असिस्टंट मॅनेजर याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन फिर्यादी यांना मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.