द इंडियन न्यूट्रिशियन कोच संस्था : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १२ दिवस दर शनिवारी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे ः उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा त्यांना १२ दिवसांचे शिबिर दर आठवड्याच्या शनिवारी पोलीस मुख्यालयात घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आहार, योगाविषयी माहिती, तसेच व्यायामाचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाणार असल्याचे द इंडियन न्यूट्रीशियन कोचच्या वतीने देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड मुख्यालय निगडी येथे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, आहारविषयक शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ५४ पोलीस अधिकारी-अंमलदारांनी सहभाग नोंदवला.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रशासन सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सर्व) मनिष कल्याणकर, रावसाहेबजाधव, राजकुमार राजमाने, तसेच द इंडियन न्यूट्रीशियन कोच संस्थेच्या आहारतज्ज्ञ सायली भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
