आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 31, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : आकाशवाणीसमोर रस्ता ओलांडताना झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर-आकाशवाणीसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. २८ जानेवारी २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास अपघात झाला.

विष्णू कुंडलिक काळे (वय ६५, रा. रामगडे बिल्डिंगशेजारी, विशाल वसाहत, हडपसर, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप विष्णू काळे (वय ३३, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल विष्णू कुंडलिक काळे आकाशवणी-हडपसर येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला. या अपघातात काळे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी पुढील तपास करीत आहेत.