आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विद्यालयीन तरुणाच्या ब्लेडने कापल्या भुवया

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022
Spread the love

समर्थ पोलिसांत फिर्याद : महात्मा फुले चौकात भेटायला बोलावून केले अघोरी कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणासोबत दोघांनी अघोरी कृत्य केलं आहे. आरोपींनी तरुणाला रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात भेटायला बोलून त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जबरदस्तीने तरुणाच्या भुवया ब्लेडने कापल्या. समर्थ पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रिझवान खलिल (रा. कागदीपुरा, कसबा पेठ आणि त्याचा साथिदार साहिल कुरेशी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, 17 वर्षीय पीडित तरुण पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी तो क्लासला जात होता. त्यावेळी आरोपी खलिल आणि कुरेशी यांनी संबंधित मुलाला फोन केला. तसेच तुझं शिकवणी वर्गात काय भानगड सुरू आहे, हे आम्हाला माहीत आहे. तू महात्मा फुले चौकात ये आपण प्रकरण मिटवू असं सांगितलं. त्यानुसार पीडित तरुण रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात आरोपींना भेटण्यासाठी गेला. त्याठिकाणी आरोपींनी तरुणाला धमकावून त्याला शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर साथीदार कुरेशी याने तरुणाचे हात पकडले तर खलिल याने ब्लेडने तरुणाच्या भुवया कापल्या. हा धक्कादायक प्रकार केल्यानंतर आरोपी फरार झाले. मुलासोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.