आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन किलो सोन्याचे दागिने चोरणारी टोळी राजस्थानमधून जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022
Spread the love

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी : एक किलो सोन्याचे दागिने केले जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विश्रांतवाडी (भैरवनगर) हद्दीतील घरातून दोन किलो ८१ ग्रॅम ८५० मिली सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चौघांना विश्रांतवाडी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केले. आरोपीकडून एक किलो ४०६ ग्रॅम ९४० मिली सोन्याचे दागिने ५६ लाख २७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मुकेश गोमाराम चौधरी (वय २२), रमेश रामलाल चौधरी (वय २७) भगाराम गोमाराम चौधरी (वय ३८) जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय ३८, सर्व , रा. खुडाला फालना, ता. बाली, जि. पाली-राजस्थान) असे अटक केलेल्या चोघांची नावे आहेत.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज तपास केला. त्यामध्ये आरोपी रेकी करीत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज फिर्यादीला दाखविले असता, त्याने मुकेश गोगाराम चौधरी (रा. राजस्थान) याला ओळखले, तो माझ्या दुकानात काम करत असून, १० डिसेंबर २०२१ रोजी गावी गेला असल्याचे सांगितले. त्यानंतर तांत्रिक तपास व सूत्रांची माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन मागोवा घेत चारही आरोपींना अटक केली. आरोपीकडून एक किलो ४०६ ग्रॅम ९४० मिनी ग्रॅम सोने एकूण ५६ लाख २७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते, पोलीस हवालदार विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोलीस अंमलदार संदीप देवकाते, प्रफुल मोरे, शेखर खराडे, योगेश चांगण, शिवाजी गोपनर व श्याम शिंदे, राज राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.