आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 4, 2022
Spread the love

वाकड पोलिसांत तिघांवर गुन्हा : पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह तिघांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने माफी मागण्यास सुरुवात केली. तसेच यापुढे अशी चूक करणार नसल्याचा माफीनामा लिहून दिला.

या गुन्ह्यातील तथाकथित थेरगाव क्वीन दोन महिला यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाने अकाउंट चालवणारी सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व धमकीचे व्हिडीओ थ्रीलिंग बनवले. ते व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, अटक केलेल्या थेरगाव क्विन हिने आपल्याला पश्चाताप होत असून गुन्ह्याचे गांभीर्य माहित नसल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे करीत आहेत.