आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विवाहितेचा पैशासाठी छळ करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 4, 2022
Spread the love

वानवडी पोलिसांत फिर्याद : सातवनगर-हांडेवाडी रस्ता येथे घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विवाहितेचा पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी ते २७ जानेवारी २०२२ दरम्यान सासरी (सातवनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) येथे घडली.

रुबी कुणाल कचरावत (वय २७, रा. सातवननगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सासरी नांदत असताना पतीने शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देत लग्नानंतर वेगवेगळ्या कारणासाठी पैशाची मागणी करून छळ केला. मारून टाकण्याची धमकी देऊन क्रूर वागणूक देत जाच केल्याने तिला जगणे असह्य केले. २७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता लहान मुलाने मस्ती केल्याने फिर्यादी ओरडल्या म्हणून पतीने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत पायरीवरून पडल्याने गुडघ्याला व अंगाला मुका मार लागला. तू मरून जा नाही तर आम्ही तुला सोडणार नाही, असे म्हणत अंगावर धावून येत गळा दाबल्याने फिर्यादी बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला असे वाटल्याने त्यांनी बेडरूममध्ये आणून टाकले. वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर पुढील तपास करीत आहेत.