आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने तरुणाची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 5, 2022
Spread the love

बारामती पोलिसांत फिर्याद : परिस्थितीमुळे नैराश्य आल्याने उचलले टोकाचे पाऊल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अभिनेता बनून चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केली. गुणवडी (ता. बारामती) येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे गुरुवारी (दि. ३ फेब्रुवारी) ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अतुल शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, अतुल गुणवडी (ता. बारामती, जि. पुणे, मूळ रा. गोखळी, ता. फलटण, जि. पुणे) येथे कुटुंबियांसह राहत होता. त्याला अभिनेता बनून चित्रपटात काम करायचे होतं. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्याला गॅरेजमध्ये काम करावं लागलं. त्यामुळे तो नैराश्यात गेला. त्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचलत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान 1 फेब्रुवारीला अतुल बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, यानंतर गुरुवारी फलटण तालुक्यातील गोखळी गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी बारामती पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.