आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांत फिर्याद : शास्त्रीनगरमधील डॉन बॉस्को शाळेसमोर घडला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : येरवडा शास्त्रीनगर चौकातील डॉन बॉस्को शाळेसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मित्रासमवेत मोटारसायकलवरून जात असताना वाहनाची धडक बसून रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

तुषार श्यामराव पाटील (वय २६) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सरदार पाटील (वय ३५, रा. वडगणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा चुलतभाऊ मित्रासमवेत शास्त्रीनगर चौकातून जात होते. त्यावेळी अज्ञात भरधाव वाहनाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल चालक तुषार पाटील यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाहनचालक न थांबता पळून गेला. येरवडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आळेकर पुढील तपास करीत आहेत.