• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

अपहरणाचा बनाव करणाऱ्या आईचे बिंग फुटले

November 30, 2023
0
20.06.2022 4
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

कोथरूड पोलिसांत फिर्याद : पोलिसांनी २४ तासांत आठजणांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोथरुडमधून एका चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आईने पोलिसांकडे केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला असता फिर्यादी महिलेनेच एका मध्यस्थामार्फत चार वर्षाच्या मुलाला एक लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली. एवढेच नाही, तर महिलेने ज्या व्यक्तीला मुलाला विकले त्याने त्या मुलाला दुसऱ्या एका दाम्यत्याला एक लाख 60 हजार रुपयांना विकले. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करुन 8 आरोपींना अटक केली आहे.

प्रियंका गणेश पवार, जन्नत बशीर शेख, रेश्मा सुतार, तुकाराम निंबळे, चंद्रकला माळी, भानुदास माळी, दीपक तुकाराम म्हात्रे आणि सीताबाई दीपक म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रियंका पवार हिने शुक्रवारी (दि.4) कोथरुड पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहराणाची तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका पवार या महिलेने चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार कोथरुड पोलिसांकडे केली. तक्रार दाखल होताच कोथरुड, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यातील 9 पथके तयार करुन मुलाचा शोध सुरु केला. दरम्यान अपहरण झालेला मुलगा दुपारच्या वेळी याच परिसरात राहणारे बांगडेवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी जन्नत बशीर शेख (रा. जळकेवस्ती, कोथरुड) हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

सुरुवातीला जन्नत शेखने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलीस नाईक आकाश वाल्मीकी व पोलीस नाईक विशाल चौगुले यांनी सीसीटीव्ही फुटेज तपसाले असता एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले. आरोपी जन्नत शेख हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने रेश्मा सुतार आणि फिर्यादी प्रियंका पवार यांच्यासोबत संगनमत करुन कट रचून निल पवार (वय-4) याला मध्यस्थी तुकाराम निंबळे (रा. मु.पो. वारु ता. मावळ) याच्यामार्फत चंद्रकला माळी व भानुदास माळी (रा. मुपो बोर्लेगाव ता. पनवेल जि. रायगड) यांना एक लाख रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, पोलिसांनी चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना त्याब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दीपक म्हात्रे व सीताबाई म्हात्रे यांना 1 लाख 60 हजार रुपयात मुलाची विक्री केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस तपास करीत आहेत.

पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी सांगितले की, आरोपी प्रियंका पवार ही पतीपासून विभक्त राहत असून, तिला दोन मुले आहेत. दुसरा मुलगा एक वर्षाचा आहे. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे अशक्य असल्याने तिने चार वर्षाच्या मुलाला जन्नत शेख, रेश्मा सुतार यांच्या मदतीने मध्यस्थी तुकाराम निंबळे याच्या मार्फत मुलाची विक्री केली. पोलिसांनी म्हात्रे दांपत्याकडून मुलाची सुटका करुन गुन्ह्यातील 1 लाख 81 हजार रुपयांची रक्कम जप्त केली. मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे सनिल जैतापूरकर, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक वृषाली पाटील, आरती खेतमाळीस, महिला पोलीस उपनिरीक्षक काजोल यादव, किसन राठोड, रतिकांत कोळी, विक्रम पवार, नागराज बिराजदार, चैतन्य काटकर, क्षिरसागर सर्व कोथरुड पोलीस स्टेशन, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह उत्तमनगर, वारजे आणि कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही दमदार कारवाई केली.

08 02 2022 news 5
Download

Latest Articles

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
Load More
Previous Post

‘थांब तुला खल्लास करतो’ म्हणत तरुणावर ‘बुछूट’ गोळीबार

Next Post

भाड्याच्या घरातून काढून टाकल्याने केला विवाहितेचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta